Cidco Lottery : सिडकोकडून खुशखबर! घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली; शेवटची तारीख काय? वाचा

Mumbai : नवी मुंबईत स्वतः चे घर असावे, अशी अनेकांची इच्छा असते. नवी मुंबईत परवडणारे घर घेण्यासाठी अनेकजण सिडकोत अर्ज करतात. सिडकोमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरे आहे. सिडको महामंडळाने सिडकोचे घर घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची मुदतवाढ करण्यात आली आहे. माझे पसंतीचे सिडकोचे घर योजनेकरिता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२५ आहे.

सिडकोतील घरांसाठी आता तुम्ही ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करु शकतात. सिडकोतर्फे याबाबत परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे,

नवी मुंबईच्या बाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल, कंळबोळीमध्ये सिडकोची घरे आहे. तब्बल २६,००० फ्लॅटसाठी ही अर्जप्रक्रिया सुरु आहे.यामध्ये अर्जदारांना घरांचे प्राधान्य निवडण्याचेही स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या परिसरात घरे घेऊ शकतात.

Pune News : परदेशात गाड्या चालवण्यातही पुणेकर अव्वल, १४ हजार ७७४ पुणेकरांनी काढले इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स

अर्जदारांना पसंतीचे घर निवडताना मदत होण्यासाठी सिडकोतर्फे योजनेतील सदनिकांचे स्वरुप पाहता यावे याकरीता खारघर सेक्टर १४, तळोजा येथे अनुभूती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.

यामुळेच ३१ जानेवारी २०२५ पर्यंत तुम्ही ऑनलाइन अर्ज करु शकतात.https://cidcohomes.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.नोंदणी करुन सदनिकांचा प्राधान्यक्रम निवडावा असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

नवी मुंबईत स्वतः चे घर घेण्यासाठी ही उत्तम संधी आहे. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी लॉटरी जाहीर केली जाते. नवी मुंबईत परवडणाऱ्या दरात तुमचे स्वतः च्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतः चे घर घ्यायचे असेल तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करावेत.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply