Cidco  : पदवीपर्यंत शिक्षण, पण बँकेत खातं उघडता न आल्याचा राग, नाशिक बँक लुटीमागचा धक्कादायक कारण

Cidco  : बिहारमध्ये पदवीपर्यंत शिकलेला, घरातील अन्य सदस्य शासकीय सेवेत असलेल्या बिहारमधील परप्रांतीय तरुणाने नाशिकमध्ये बँकेची तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. बँकेत खाते उघडता न आल्याने झालेला संताप आणि बँकेत जाणवलेला अलबेलपणा यातून थेट घरफोडीचा कट त्याने रचला. मात्र, त्यात त्याला दोन वेळा प्रयत्न करूनही यश आले नाही. पोलिसांनी या घटनेचा उलगडा करीत संशयितास जेरबंद केले.

एकाच वर्षभरात सलग दोनवेळा अंबडच्या इंडियन बँकेच्या शाखा कार्यालयाच्या स्लॅबला भगदाड पाडून स्ट्राँग रूममधील तिजोरी लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्याला एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अखेर जेरबंद केले. अमितकुमार शिवशंकर प्रसाद (वय २२, रा. अंबडगाव, मूळगाव लक्ष्मीपूल, बिहार) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दीड लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. त्याने घरफोडी चोरीचे एकूण सात गुन्हे केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नाशिक-मुंबई महामार्गावरील अंबड शाखेच्या इंडियन बँकेच्या स्ट्राँग रूमच्या स्लॅबला भगदाड पाडून मागील वर्षी १८ जुलै २०२३ बँकेच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर संशयिताने पुन्हा वर्षभरानंतर १९ जुलै २०२४ रोजी इंडियन बँकेची तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायरन वाजल्याने त्याने पळ काढला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी ठाण्याचे गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास सुरू केला.

Harbour Local Trains : हार्बर लोकल सँडहर्स्ट रोडपर्यंतच, रेल्वेच्या हालचाली, भायखळा स्टेशनचा फास्ट थांबाही रद्द

घटनास्थळाचे सीसीटीव्ही फूटेज तसेच तांत्रिक व मानवी साधनांचा वापर करून पोलिसांनी अंबडगावात भाडेतत्त्वाने राहणाऱ्या संशयित अमितकुमार याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने दोनवेळा इंडियन बँकेची स्ट्राँग रूम फोडून तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. चोरट्याने अंबड एमआयडीसीमधील दोन-तीन कंपन्यांमध्ये तांबे आणि अन्य साहित्य चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिस उपनिरीक्षक अतुल पाटील, संदीप शेवाळे यांच्यासह अविनाश चव्हाण, जनार्दन ढाकणे, किरण सोनवणे, श्रीहरी बिराजदार, हेमंत आहेर, अर्जुन कांदळकर आदींनी ही कारवाई केली.

...म्हणून बँकेला केले लक्ष्य

संशयित अमितकुमारचे बिहारमध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्याचे आई-वडील व भाऊ हे तिघेही सरकारी सेवेत आहेत. तो नाशिकमधील एका खासगी कंपनीत रुजू झाला. कंपनी व्यवस्थापनाने अंबडच्या इंडियन बँकेत खाते उघडण्यास त्याला सांगितले. मात्र, बँकेने विविध कागदपत्रांची मागणी केली. त्यामुळे त्याला बचत खाते सुरू करता आले नाही. बँकेत सारे काही अलबेल सुरू असल्याचे त्याला जाणवले. म्हणून अमितकुमारने दुसऱ्या दिवशी रात्री बँकेची तिजोरी लुटण्याचा प्रयत्न केला. त्यात त्याला यश आले नाही. मात्र, पुन्हा दुसऱ्यांदा लुटीच्या प्रयत्नाविषयी पोलिसांनी विचारणा केली. त्यावर ‘पावसाच्या आवाजामुळे आत चोरी करताना बाहेर आवाज जात नाही’, असे चोरट्याने सांगितले.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply