Chhattisgarh Naxal : छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश; तब्बल 30 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

Chhattisgarh Naxal : छत्तीसगडमध्ये नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश आले आहे. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सक्रिय असलेल्या नक्षल संघटनेतून तब्बल 30 नक्षलवाद्यांनी  आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे छत्तीसगढमध्ये हा नक्षल चळवळीला मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे नक्षलचा हिंसक मार्ग सोडून सर्वसामान्याप्रमाणे जीवन जगण्याचे आवाहन प्रशासन करत असताना सुरक्षा दलाच्या नक्षल विरोधी कारवाईला मोठे यश आले आहे.

विशेष बाब म्हणजे आत्मसमर्पण करणाऱ्या 9 नक्षलवाद्यांवर सरकारने एकूण 39 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. बिजापूरमध्ये  जानेवारी 2024 पासून आतापर्यंत एकूण 180 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तर त्यातील 76 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच पोलिसांनी आतापर्यंत अनेक चकमकीत तब्बल शंभरहुन अधिक नक्षल्याचा खात्माही केलाय. 

Akola News : संशयित आरोपी मृत्यू प्रकरण : धक्कादायक माहिती आली समोर; कस्टडी रूमचा सीसीटीव्ही होता बंद

नक्षलविरोधी मोहिमेला मोठे यश

फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान माओवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला करणे व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे असे देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या तसेच लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दरम्यान नक्षलावादी कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच आता पर्यंत सुरक्षा दलाच्या जवानांनी वेगवेगळ्या कारवाईत अनेक नक्षल्यांचे डाव उधाळून अनेकांचा खात्मा केलाय. अशातच छत्तीसगडमध्ये तब्बल 30 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना आणि नक्षल विरोधी मोहिमेला मोठे यश आल्याचे मानलं जात आहे. 

 कतरंगट्टा जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक  

नुकतेच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने पेरमिली दलमचे काही माओवादी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकुन असल्याच्या माहिती मिळाली होती. मिळालेल्या या गोपनीय माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे दोन पथक तातडीने या  जंगल परिसरात पाठवण्यात आले.

दरम्यान हे अभियान राबवित असतांना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार सुर केला. त्यानंतर पोलीस आणि नक्षल्यामध्ये काही काळ चकमक झाली. या दरम्यान संधी मिळताच पोलीसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येण्याबाबत आवाहन केले. मात्र, माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी जावानांनी प्रत्युत्तरादाखल आणि स्वरंक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

तीन जहाल माओवाद्यांचा खात्मा 

दरम्यान, पोलिसांनी या परिसरात शोध मोहीम राबवली असता, परिसरात तीन जहाल माओवाद्यांचे मृतडेह आढळून आले. मारल्या गेलेल्या या माओवाद्यांमध्ये एक डीव्हीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडरसह एक कंपनी सदस्य आणि एक दलम सदस्य यांना ठार करण्यात यश आले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे एकुण 22 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते. घटनास्थळावरुन पोलिसांना तीन ऑटोमॅटीक शस्त्र आणि इतर साहित्य आढळून आले आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply