Chhatrapati Sambhajinagar : देवीचे विसर्जन करायला गेले, बाप- लेक नदीत बुडाले; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Chhatrapati Sambhajinagar : राज्यभरात दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात पार पडला. सार्वजनिक मंडळातील देवींचे मोठ्या जल्लोषात विसर्जनही करण्यात आले. अशातच छत्रपती संभाजीनगरमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. देवीच्या मूर्तीचे विसर्जन करताना पूर्णा नदीत बाप लेक बुडाल्याची मन सुन्न करणारी घटना घडली आहे. सध्या अग्निशामक दल आणि रेस्क्यु पथक यांच्याकडून दोघांचीही शोध मोहिम सुरू आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बाप लेक बुडाण्याची घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडच्या वांजोळा परिसरात घडली. पूर्णा नदीपात्रामध्ये हे दोघं बापलेक देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते त्यावेळी ही भयंकर घटना घटना घडली. सांडू नामदेव सागरे आणि निवृत्ती सांडू सागरे असे या दोघांची नावे आहेत.

Mumbai : घटनेची जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी पायउतार व्हावे, महायुती सरकारवर शरद पवार संतापले

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह अग्निशामक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही पथकांनी नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली मात्र अद्यापही या बाप लेकाचे मृतदेह या पथकाच्या हाती लागले नसून शोध मोहीम सुरूच आहे. दसऱ्याच्या दिवशी बाप- लेक नदीत बुडाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, यावेळी त्यांचा १४ वर्षाचा मुलगा नदीकाठी उभा राहिल्याने सुदैवाने तो बचावला. त्याने याबाबतची माहिती दिल्यानंतर गावकरी नदीकडे धावले. त्यानंतर बचाव पथकांना याबाबतची माहिती देण्यात आली. बचाव पथकांनी सायंकाळपर्यंत त्यांचा शोध घेतला, मात्र यश आले नाही. शेवटी अंधार पडल्यानंतर शोधकार्य थांबवण्यात आले. रविवारी पुन्हा शोधकार्य सुरु केले जाणार असल्याची माहिती पोेलिसांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply