Maratha Reservation : आरक्षण द्या, अन्यथा विधानसभा लढवू - मनोज जरांगे

Chhatrapati Sambhajinagar : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महिनाभरात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आमचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवू, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आज जाहीर केली. राज्यातील १२७ मराठाबहुल विधानसभा मतदारसंघांत चाचपणी केल्याचा दावाही त्यांनी केला.

जरांगे म्हणाले, की निवडणुकीच्या रिंगणात मी स्वत उतरणार नाही, पण स्वताचा पक्ष काढून उमेदवार उभे करायचे की अपक्ष म्हणून, हे अद्याप ठरलेले नाही. वेळ आली तर मराठा, बंजारा, मुस्लिम, दलित, लिंगायत यांची मोट बांधून निवडणूक लढविली जाईल.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची तुफान टोलाबाजी; राज ठाकरे आणि छगन भुजबळांचं नाव घेत केला मोठा खुलासा

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सग्या-सोवन्यांसह नऊ मागण्यावर सरकारला १३ जुलैपर्यंत वेळ दिलेला आहे. मला व समाजाला राजकारणात जायचे नाही, पण आरक्षण दिले नाही तर काय करणार?

हे सरकारच आम्हाला राजकारॅणात ढकलत आहे. पहिल्या टप्प्यात २४ व नंतर ४३ विधानसभा मतदारसंघांची चाचपणी केली आहे याचा अर्थ आम्ही राजकारण उतरणारच आहोत, असा नाही, आम्ही फक्त चाचपणी करत आहोत. समाजाला न्याय मिळाला नाही तर मैदानात उतरावे लागेल

सर्व समाजाची मोट बांधणार

शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांसदर्भात महिनाभरात निर्णय घेतला नाही तर मराठा, बंजारा, मुस्लिम, दलित व इतर समाजाची मोट बांधणार असल्याचे जरागे म्हणाले समाजातील सर्व घटकांना काय देता वेडील, याचा विचार करत आहोत, असेही त्यांनी नमूद केले



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply