Chhatrapati Sambhaji Nagar : आता बघ्याची भूमिका घेऊ नका, थेट कारवाई करा; हिंसक आंदोलनानंतर पोलिसांना सूचना

Chhatrapati Sambhaji Nagar : मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी शांततेत सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना समोर येत आहे. यात अनेक राजकीय नेत्यांची घरं आणि कार्यालय पेटवून देण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून विशेष सूचना देण्यात आल्या आहे. यापुढे होणाऱ्या हिसंक आंदोलनात बघ्याची भूमिका घेऊ नका, तोडफोड आणि नुकसान होत असल्यास थेट कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना  देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस आता अलर्ट मोडवर आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हिंसक वळण लागलं. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके, संदीप क्षीरसागर यांची घरं पेटवून देण्यात आली. सोबतच राष्ट्रवादीचे कार्यालय देखील पेटवण्यात आले.बीड शहरातील बस स्थानकात आंदोलकांनी तब्बल 72 बस फोडल्या. तिकडे हिंगोली जिल्ह्यात देखील भाजपचा कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एकंदरीत या सर्व परिस्थितीनंतर मराठवाड्यात तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आता पोलिसांनी बघ्याची भूमिका न घेता थेट कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि जिल्ह्यातील पोलीस देखील अलर्ट झाले आहे. 

Andhra Pradesh Train Accident: आंध्र प्रदेश रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा १३ वर; एका चुकीमुळे घडली मोठी दुर्घटना

 

पोलिसांकडून परिस्थितीचा आढावा...

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण लागत असल्याने पोलीस देखील आता अलर्ट झाले आहे. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण पोलीस या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक आंदोलनावर लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या उपोषण आणि आंदोलन याची माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहे. सोबतच राजकीय नेत्यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या बाहेर देखील पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि पोलीसांच्या बैठकीत काय काय घडलं?

मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात हिसंक वळण लागत असल्याने याची दखल घेत, सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांची बैठक झाली आहे. यावेळी पोलीस महसंचालक यांनी सोमवारी दिवसभराच्या घडामोडींचा आढावा सादर केला. मराठा समाजाच्या आंदोलनाचा गैरफायदा काही समाजकंटक घेत आहेत, य समाजकंटकांचा शोधण्याचं काम सुरू आहे, घरं जाळणं, त्यातून चोऱ्या करण्याचा उद्देश समाजकंटकांचा आहे, जे या आंदोलनांचा गैरफायदा घेऊ शकतात,  या समाजकंटकांना आळा घालण्यासाठी पोलीसांच्या विविध तुकड्या तयार करण्यात येत आहेत, गुप्तचर यंत्रणा यावर काम करत असल्याची माहिती पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना दिली आहे. 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply