Chhagan bhujbal : सर्वात मोठी राजकीय घडामोड; विधानसभा जागांवरून भाजप - राष्ट्रवादीत होणार राडा, छगन भुजबळांनी थेट आकडाच सांगितला!

Chhagan bhujbal : आगामी विधानसभा निडवणूक जाहीर होण्याची आधीच राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. विधानसभा निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच जागावाटपावरून भाजप - राष्ट्रवादीत राडा होण्याची शक्यता दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीत किती जागा मिळाल्या पाहिजे, याचा आकडा छगन भुजबळांनी सांगितला. छगन भुजबळ यांनी ८० जागांचा आग्रह कायम ठेवला आहे.

छगन भुजबळ यांनी आगामी विधानसभा जागांवरून मोठा दावा केला आहे. छगन भुजबळ यांनी महायुतीमधील ८० जागांचा आग्रह कायम ठेवला आहे. छगन भुजबळ यांच्या दाव्याने महायुतीत जागावाटपांवरून जुंपण्याची शक्यता आहे.

Kuwait Building Fire : 45 भारतीय कामगारांचे पार्थिव मायदेशी आणले ! हवाई दलाचे एअरक्राफ्ट कोची एअरपोर्टवर दाखल

खासदारकीच्या इच्छेवर भाष्य करताना छगन भुजबळ म्हणाले, 'माझी खासदार होण्याची इच्छा आहे. नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार झालो होते. दिल्लीतूनही माझं तिकीट फायनल झालं होतं. त्यानंतर मी कामालाही लागलो होतो. मात्र, नंतर मी थांबलो. नाशिकमध्ये अर्ज दाखल करण्याच्या एका दिवसाआधीच तिकीट जाहीर करण्यात आलं. पक्ष म्हटल्यावर काही गोष्टी मनाप्रमाणे होत नाही. काही वेळा थांबावं लागतं'.

'महायुती मागे का पडली, याचा अभ्यास करण्याची गरज आहे. 400 पारचा नारा दिल्याने संविधान बदलणार असा प्रचार करण्यात आला. यामुळे आदिवासी, दलित आणि मुस्लिम समाज दूर गेला,असेही भुजबळांनी सांगितले.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply