Chhagan Bhujabal : छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा; मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

Chhagan Bhujabal : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं आहे. एकीकडे मराठा समाजाने ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ओबीसी समाजाने मराठा समाजाच्या मागणीला विरोध केला आहे. या मुद्द्यावरून दोन्ही गटाच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. आता या वादात मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला बसले होते. लक्ष्मण हाके यांच्या मागणीला छगन भुजबळ यांनी पाठिंबा दर्शवला. यानंतर मराठा क्रांती मोर्चाने मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

Dharashiv Crime News : धाराशिव जिल्ह्यात भरदिवसा गाेळीबार; वाळू माफियांच्या दाेन गटात राडा

मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध कायम ठेवला आहे. लक्ष्मण हाके यांचं उपोषणस्थळ वडीगोद्री येथूनही छगन भुजबळ यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा विरोध कायम ठेवला. यावरून मराठा क्रांती मोर्चाचे धनाजी साखळकर यांनी आक्रमक भूमिका घेत छगन भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

'छगन भुजबळ यांच्यासारखे मंत्री संवैधानिक पदावर राहून मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी उभं करत असेल, या मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. भुजबळ यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, अन्यथा मराठा समाज शांत बसणार नाही, असा इशाराही साखळकर यांनी दिला.
 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply