Chennai Cyclone Michaung : चक्रीवादळामुळे चेन्नईत ५ जणांचा मृत्यू; तेलंगणासाठी रेड अलर्ट

Chennai Cyclone Michaung : चेन्नईमधील चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे झाडे कोसळली असून अनेक ठिकाणी विद्युत अपघातांचे प्रकार घडले आहेत. यात ५ जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालीय.

बंगालच्या उपसागरात २ डिसेंबर रोजी आलेले मिचॉन्ग चक्रीवादळ आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकलं. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आज रेड अलर्ट देण्यात आला होता. आज ५ डिसेंबरला तेलंगणासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय.

Alandi Bandh : ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यास प्रारंभ, हजाराे वारकरी आळंदीत; बंदच्या पार्श्वभूमीवर पाेलीसांचा तगडा बंदाेबस्त

चक्रीवादळामुळे चेन्नईत मुसळधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालीय. चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पाणी साचल्याने धावपट्टी बंद करण्यात आलीय. वादळामुळे तामिळनाडूतील महाबलीपुरम बीचवर समुद्राची पातळी सुमारे ५ फुटांनी वाढलीय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply