9 लिंबूची किंमत तब्बल 2.36 लाख; काय आहे या 'शक्तीशाली' लिंबूमध्ये खास? जाणून घ्या

चेन्नई- लोकांची जेव्हा श्रद्धा बसते तेव्हा ते काहीही करण्यास मागेपुढे बघत नाहीत. अनेक मंदिरांना लाखो-कोटी रुपये, महागड्या भेटवस्तू भाविकांकडून दिल्या जातात. श्रद्धेसमोर लोक सर्व गोष्टींना गौण समजतात. तमिळनाडूच्या विल्लुपुरम मंदिरातील देवावरही लोकांची अशीच श्रद्धा आहे. मंदिरात असणाऱ्या देवाच्या मूर्तीला लिंबू अर्पण केले जातात. या लिंबूंना भाविकांच्या दृष्टीकोनातून फार महत्त्व आहे.

लिंबू देवाला चढवल्यानंतर त्याची बोली लावली जाते. मंगळवारी लिंबूंची बोली लावण्यात आली. ९ लिंबू तब्बल २.३६ लाख रुपयांना विकले गेले आहेत. लोकांचा असा विश्वास आहे की, या लिंबूंचा रस पिल्यानंतर मुल न होणाऱ्या दाम्पत्याला मुल होतं आणि कुटुंबामध्ये समृद्धी येते. लोकांच्या या मान्यतेला कोणताही शास्त्रीय आधार नाही. केवळ श्रद्धेपोटी असं केलं जातं.

Pune : पुणे जिल्ह्यावर पाणी संकट कायम; २६ धरणांमध्ये मिळून ५६.३१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

मंदिर पवित्र लिंबूंसाठी प्रसिद्ध आहे. लोकांचा असा दृढ विश्वास आहे की, या लिंबूमध्ये चमत्कारिक शक्ती आहे. कारण लिंबू देव मुरुगाच्या भाल्यावर लावले जातात. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील बातमी दिला आहे. विल्लुपुरमच्या तिरुवनैनल्लूर गावात दोन डोंगराच्या मध्ये असलेल्या एका छोट्या मंदिरातील देवाच्या दर्शनासाठी हजारो लोक येत असतात. विशेषत: दरवर्षी पंगुनी उथिरम उत्सवावेळी भाविकांचा ओघ या मंदिराकडे वाढतो.

मंदिरातील पुजारी पूजाविधीवेळी देवाला लिंबू अर्पण करतात. नऊ दिवसाच्या यात्रेदरम्यान दरदिवशी एक अशा पद्धतीने लिंबू देवाच्या भाल्यावर लावले जातात. नऊ दिवसानंतर या लिंबूंची बोली लावली जाते. भाविक मोठी किंमत देऊन हे लिंबू खरेदी करण्याचा प्रयत्न करत असतात. यावर्षी २.३६ लाखांना हे लिंबू विकले गेले आहेत.दाम्पत्य मुल होण्यासाठी लिंबू घेतात. शिवाय व्यापारी आणि व्यावसायिक आपल्या उद्योगात उत्कर्ष व्हावा यासाठी लिंबू खरेदी करतात. देवाला अर्पण करण्यात आलेले हे लिंबू शुभ आणि शक्तीशाली मानले जातात. पण, ही केवळ लोकांची श्रद्धा आहे. याबाबत कोणतीही शास्त्रीय आकडेवारी उपलब्ध नाही. मिळालेल्या माहितीनुसार, कुलाथूर गावातील एका जोडप्याने ५०, ५०० रुपयांना एक लिंबू खरेदी केला

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply