बारामती - सासवड हत्याकांडतील संबंधितांचे मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासा; विजय शिवतारेंची मागणी

बारामती - सासवड येथे घडलेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात सहभागी लोकांचे कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केली आहे. शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. यामध्ये त्यांनी विद्यमान आमदारांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख आणि हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या तत्परतेने खुनाला वाचा फुटली आसा त्यांनी म्हटलं आहे. तर सासवडचा बिहार झाला असून या प्रकरणात आमदार, त्यांचा एक सहकारी, सासवडचे पोलीस आणि ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर्स यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासायला हवेत असे शिवतारे यांनी आज पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

या घटने बाबत शिवतारे यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. ते पोलीस प्रशासनाच्या कार्य प्रणालीवर संशय व्यक्त करीत आहे.

१) अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्याची घाई का केली?

२) ३६ तास माणूस रस्त्याच्या कडेला तडफडत असताना ग्रामीण रुग्णालयाने रुग्णवाहिका पाठविण्यास नकार का दिला?

३) शवविच्छेदन अहवालात शरीरावरील जखमांचा उल्लेख डॉक्टरने कुणाच्या दबावाखाली टाळला?

४) जेजुरीला फ्रीझर असताना मृतदेह फ्रीझरमध्ये ठेऊन त्याची ओळख का पटवण्यात आली नाही?

५) अवघ्या २४ तासात सासवड नगरपालिकेने मृतदेह जाळून का टाकला?

एकंदरीतच सासवड येथील खून प्रकरण नंतर पुरंदर मधील राजकीय वातावरण गरम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply