Chandrayaan-3 Mission : चांद्रयान ३ चंद्राच्या अगदी जवळ पोहोचलं, सॉफ्ट लँडिंगपासून फक्त एक कक्षा दूर

Chandrayaan 3 News : भारतासह जगाच्या नजरा इसरोच्या मिशन चांद्रयान-३ कडे लागल्या आहेत. १४ जुलै रोजी चंद्राच्या दिशेने झेपावलेले यान आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. चांद्रयान ३ आता चंद्राच्या दिशेने शेवटच्या कक्षेत पोहोचलं आहे. यापुढे चांद्रयानाचा प्रवास अत्यंत खडतर आणि निर्णायक असेल. इस्रोच्या माहितीनुसार, या कक्षेत पोहोचल्यानंतर ते लँडर वेगळे करण्याची प्रक्रिया सुरू करतील.

इस्रोने ट्वीटमध्ये म्हटलं की, चांद्रयान-३  ने चंद्राच्या दिशेने जाणारी आणखी एक आणि शेवटची कक्षा पूर्ण केली आहे. चांद्रयाना आता चंद्रापासून 153 किमी x 163 किमी अंतरावर आहे. आता येथून लँडर वेगळे केले जाईल आणि कॅरिअर 17 ऑगस्टपासून आणखी एक फेरी पूर्ण करेल. सर्व काही ठीक राहिल्यास, लँडर त्याच्या वेळापत्रकानुसार 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणा आहे.

इस्रोच्या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की जर सर्व काही ठीक झाले तर येत्या काही दिवसांत त्यांचे लँडर चंद्रावर असेल. या यशामुळे चंद्राच्या प्रवासासाठी पुढील मार्ग खुले होतील. 

Mumbai : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणं आणखी सोपं झालं! शिंदेंच्या हस्ते मोबाईल Appचं उद्घाटन

चांद्रयान ३ मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाल्यास भारत चंद्रावर पोहोचणारा जगातील चौथा देश ठरेल. इतकेच नाही तर कोणत्याही अवजड रॉकेटशिवाय हे मिशन पूर्ण करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. याशिवाय, भारताच्या खात्यात आणखी एक यश येणार आहे, ज्यानुसार सर्वात कमी खर्चात हे मिशन राबवणारा भारत देश असेल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply