Chandrashekhar Guruji News: वास्तूतज्ज्ञ चंद्रशेखर गुरूजी यांची निर्घृण हत्या; हॉटेलमधील CCTV समोर

हुबळी: 'सरल वास्तू'च्या माध्यमातून स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करणारे चंद्रशेखर गुरुजी (Chandrasekhar Guruji) उर्फ चंद्रशेखर अंगडी यांची हुबळीच्या एका हॉटेलमध्ये चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. मंगळवारी ही घटना घडली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, चंद्रशेखर गुरुजी हे हुबळीच्या हॉटेलमध्ये आल्यानंतर दोघा अज्ञातांनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. चंद्रशेखर यांच्या हत्येनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.

उत्तर कर्नाटकातील हुबळी येथे एका हॉटेलमध्ये मंगळवारी चंद्रशेखर गुरुजी यांची हत्या झाली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने सपासप वार केले. हॉटेलच्या लॉबीमध्ये ते आले होते. त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली.

या घटनेची माहिती मिळताच, पोलीस आयुक्त लभु राम, डीसीपी (कायदा आणि सुव्यवस्था) साहिल बागला, डीसीपी (क्राइम आणि वाहतूक) गोपाल तसेच इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले. आरोपींच्या शोधासाठी श्वानपथकही रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्घृण हत्येच्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply