Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वाहनांची तपासणी; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथक तैनात

Chandrapur News : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली असून याचे पालन करण्यासाठी नियमावली आखण्यात आली आहे. या अनुषंगाने  चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. यासाठी गठीत करण्यात आलेल्या पथकांद्वारे ही तपासणी केली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि नि:पक्षपणे राबविण्यासाठी व आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात विविध पथकांचे गठन करण्यात आले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर तैनात स्थायी निगराणी पथकांनी (एसएसटी) जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची कडक तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्याच्या सीमेवर स्थायी निगराणी पथक (एसएसटी) तैनात करण्यात आले आहे. 

Electric Shock : विजेच्या झटक्याने युवकाचा मृत्यू; नातेवाईकानी केली शासकीय रुग्णालयाची तोडफोड

जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. चारचाकी वाहनाच्या डीक्कीसह सीट जवळील भागसुद्धा तपासावा, यात असणाऱ्या सर्व बॅग्ज व इतर बाबींची तपासणी करावी. काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तालुक्यातील वरीष्ठ अधिकाऱ्यांनी रात्री बेरात्री चेकपोस्टवर आकस्मिकपणे भेट देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply