Chanakya Niti : चाणक्य म्हणतात पुरुषांच्या या चुकांमुळे होतं संसाराचं वाटोळं

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते, तसेच ते एक कुटनीतीतज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी आपल्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, त्या आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. संसार कसा करावा? पती पत्नीचं नातं कसं असावं? पतीची कर्तव्य काय आहेत? पत्नीची कर्तव्य काय आहेत? अशा एकना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती -पत्नी हे संसाररूपी रथाचे दोन चाकं असतात, हे दोन्ही चाकं समान गतीनं धावणे अपेक्षित असतं, मात्र जेव्हा यातील एक चाक मागं पडतं किंवा गतीमध्ये बदल होतो, तेव्हा हा रथ थांबतो. तो पुढे जात नाही. प्रगतीला खीळ बसते. चाणक्य म्हणतात पुरुष आपल्या आयुष्यात अशा काही चुका करतो, ज्यामुळे संसार उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पत्नीचा अपमान – चाणक्य म्हणतात जो पुरुष वारंवार आपल्या पत्नीचा अपमान करतो. तो स्वत:हून आपला संसार धोक्यात आणतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, पुरुष जरी संसारासाठी पैसे कमवत असला, आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करत असला तरी देखील संसारामध्ये पुरुषाचा जेवढा वाटा असतो, तेवढाच किंवा त्याहून जास्त वाटा हा स्त्रीचा असतो, त्यामुळे पत्नीचा कधीही अपमान करू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

पर स्त्री – चाणक्य म्हणतात घरात पत्नी असून देखील जेव्हा पुरुष एखाद्या दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होत असेल किंवा तो तिच्या प्रेमात पडला असेल तर अशा संसाराचं वाटोळं होण्यास फार काळ लागत नाही. त्यामुळे पुरुषांनी अशा गोष्टींपासून नेहमी लांब राहावे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

पत्नीचा अनादर – चाणक्य म्हणतात पत्नीचा नेहमी आदर केला पाहिजे, कधीही पत्नीच्या मताचा अनादर करू नका, जर तुम्ही पत्नीच्या मताचा अनादर कराल, तर घरातील वातावरण नेहमी अशांत राहील.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *