CBI Raid IN Mumbai : बँक फसवणूक प्रकरण, जेट एअरवेजचे मालक नरेश गोयल यांच्या घरासह 7 ठिकाणी CBI चे छापे

Mumbai News : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण यंत्रणा म्हणजेच सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने 538 कोटी रुपयांच्या बँक फसवणूक प्रकरणी नरेश गोयल यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांसह 7 ठिकाणांची छापे टाकले आहेत. बँकेच्या फसवणूक प्रकरणी हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनरा बँकेच्या 538 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी जेट एअरवेज आणि त्याचे संस्थापक नरेश गोयल यांच्या मुंबईतील घर आणि कार्यालयासह सात ठिकाणी छापे टाकले.

सीबीआयने शुक्रवारी नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता गोयल आणि विमान कंपनीचे संचालक गौरांग आनंद शेट्टी यांच्या निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे टाकले.सीबीआयने कॅनरा बँकेच्या तक्रारीवरून 538 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीचा नवीन गुन्हा दाखल केला आहे.

सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेट एअरवेजच्या अनेक माजी संचालकांसह इतर अनेक आरोपींच्या निवासस्थान आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात येत आहेत. दिल्ली आणि मुंबईतील जेट एअरवेजच्या कार्यालयावर, एअरवेजचे माजी अधिकारी आणि नरेश गोयल यांच्या घर आणि कार्यालया वर छापे टाकण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, जेट एअरवेजने कॅनरा बँकेकडून सुमारे 538 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. याबाबत काही सरकारी कर्मचाऱ्यांसह इतरांवरही कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply