Cancer Death : चिंताजनक! ५ पैकी ३ कॅन्सर रूग्णाचा भारतात मृत्यू, ICMR चा दावा


Cancer Death Toll Soars in India : भारतासाठी कॅन्सर गंभीर धोका बनला आहे. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर भारतात ५ पैकी ३ रूग्णांचा मृत्यू होतो. आयएसीएमआरच्या अभ्यासातून ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. आयसीएमआरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र टोपरानी यांच्या मते, कॅन्सर झाल्याचे उशीरा समजणे, उपचारावेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागणे, यासारख्या कारणामुळे अनेक रूग्णांचा मृत्यू होतो. त्यामुळे कॅन्सरने मृत्यू होणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २००० मध्ये कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या ४.९ लाख इतकी होती, पण २०२२ मध्ये ही संख्या ८७ टक्क्यांनी वाढली आहे. २०२२ मध्ये कॅन्सरमुळे ९.१७ लाख रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतात पाच पैकी तीन रूग्णांना कॅन्सर झाल्याचे समजल्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू होतो. हा धक्कादायक खुलासा दिल्लीमधील आयसीएमारच्या वैज्ञानिक अभ्यासाच्या रिपोर्ट्समधून समोर आला आहे. आयसीएमआरच्या या रिपोर्ट्सला आंतराराष्ट्रीय ल लांसेट रीजनल हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. भारतामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कॅन्सरच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यातच नव्या अभ्यासामुळे चिंता आणखी वाढली आहे.

Ladki Bahin Yojana : पन्नास लाख लाडक्या अपात्र? राज्य सरकारचे वर्षाचे वाचणार 1600 कोटी रुपये

लिंग आणि वयाच्या आधारावर कॅन्सरवर झालेले हे पहिलेच सर्वेक्षण, अभ्यास असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. कॅन्सर रूग्णांचा वेळेआधीच मृत्यूदर ६४.८ टक्के असल्याचे समोर आले आहे. ग्लोबर कॅन्सर ऑब्जर्वेटरीच्या रिपोर्ट्सच्या अंदाजांनुसार, भारतामध्ये कॅन्सरमुळे महिलांचा मृत्यू होण्याचे प्रणाम अतिशय वेगाने वाढत आहे. प्रत्येकवर्षी यामध्ये २ ते ४ टक्क्यांनी वाढ होत आहे. महिलांचा कॅन्सरमुळे मृत्यू होण्याची अनेक कारणे आहेत, त्यामध्ये वेळेवर आणि योग्य उपचार न करणे या कारणाचा समावेस असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

भारतीय महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर सर्वाधिक असल्याचे संशोधनात आढळले आहे. महिलांना होणाऱ्या कॅन्सरच्या नव्या प्रकरणात स्तनाचा कॅन्सरचे प्रमाण १३.८ टक्के इतके आहे. १०.३ टक्के महिलांना तोंडाचा कॅन्सर, ९.२ टक्के महिलांना गर्भाशयाचा कॅन्सर तर ८.८ टक्के महिलाना श्वसनाचा कॅन्सर होत असल्याचे समोर आलेय.

पुरूषांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशातील एकूण कॅन्सरग्रस्त पुरूष रूग्णांपैकी १५.६ टक्के रूग्णांना तोंडाचा कॅन्सर झालेला आहे. तर श्वसनाच्या कॅन्सरचे रूग्ण ८.५ टक्के आहे, कोलोरेक्टरच्या रूग्णांची संख्या ६.३ टक्के इतके आहे. अभ्यासामध्ये, फुफ्फुस, ब्रॉन्की आणि श्वसनमार्गाचा कर्करोग श्वसन कर्करोग म्हणून वर्गीकृत केला जातो. श्वसन आणि अन्ननलिका कर्करोगामध्ये 100 नवीन निदान प्रति 100 मृत्यूचे प्रमाण अपवादात्मकपणे जास्त आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply