Cabinet Expansion : राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली? प्रतीक्षेत असलेल्या नेत्यांची मंत्रीपदी लागणार वर्णी?

Cabinet Expansion : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात घडामोडींना वेग आला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांच्या आधी मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात केला जाणार, अशी माहिती साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

पावसाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात यावा, अशी मागणी तिन्ही पक्षांच्या आमदारांकडून केली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काल मध्यरात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये काहीसं नाराजीचं वातावरण बघायला मिळत आहे. त्यामुळेच पावसाळी अधिवेशनाआधीच मंत्रिमंडळ विस्तार केला जावा, अशी मागणी आमदारांकडून होत असल्याचा अंदाज आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार पावसाळी अधिवेशनाअगोदर २७ जून रोजी केला जाईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Manoj Jarange-Patil: मनोज जरांगे ओबीसीमधूनच आरक्षणावर ठाम का?, टेक्निकल गोष्ट समजून घ्या...

राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला अपयशाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केलं जाणार आहे. त्यामुळे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. तर काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत मंत्रीमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नुसत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाने अजित पवार गटापेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे या शिंदे गटातील नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याचा अंदाज आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष या मंत्रिमंडळा विस्ताराकडे लागलं आहे. या मंत्रिमंडळात कोणत्या आमदारांची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेत.

कोणत्या आमदारांची मंत्रीपदी लागणार वर्णी?

साम टिव्हीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गटातून आशिष जैस्वाल, यामिनी जाधव, संजय शिरसाट, भरत गोगावले, आणि लता सोनावणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर अजित पवार गटाकडून इंद्रनील नाईक, अण्णा बनसोडे, संग्राम जगताप ही नावे चर्चेत आहेत. तर भाजपकडून नितेश राणे, मनीषा चौधरी, माधुरी मिसाळ, संजय कुटे, राणाजगजित सिंह पाटील, देवयानी फरांदे याचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply