Buldhana News : काळजी घेऊनही बुलाढाण्यात डेंग्यू, चिकनगुनियाचा शिरकाव, आराेग्य विभाग अलर्ट

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया डाेकं वर काढू लागला आहे. जिल्ह्यात डेंग्यूचे 30 रुग्ण तर चिकनगुनियाचे 12 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्याचा आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला आहे. नागरिकांनी देखील आरोग्याची काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

बुलढाणा जिल्ह्यात 556146 घरांची तपासणी करण्यात आली. यामधील तब्बल 44493 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. जानेवारी ते मे 2024 पर्यंत जिल्ह्यात डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत 482 संशयित रक्तजल नमुने तपासण्यात आले आहे. त्यामध्ये 30 रुग्ण डेंग्यूचे आढळून आले.12 रुग्ण चिकनगुनियाचे आढळून आले आहे.

Sanjay Raut : पुण्यातील लाडले भाऊ ड्रग्सच्या आहारी गेलेत; अर्थसंकल्पावरून संजय राऊतांचा महायुतीला टोला

या मोहिमे अंतर्गत 13 शहरांमध्ये आणि 52 प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत 596146 घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 44493 घरांमध्ये डासअळ्या आढळून आल्या. 17784159 घरातील भांडी तपासण्यात आली. पैकी 138115 भांड्यांमध्ये डासअळ्या आढळून आल्या.

दरम्यान पावसाळा सुरू झाल्याने डेंग्यू,मलेरियासह साथीच्या आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोग्य विभाग 'अलर्ट' झाला असून, शहरात डेंग्यूच्या डासांची पैदास होणारी ठिकाणे नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.

डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये धडक विशेष मोहीम राबविल्या जाणार आहे. त्यासाठी 7 शहर व 40 गावांमध्ये 148 आरोग्य कर्मचाऱ्यांचे पथक गठीत करण्यात आले असून कीटक शास्त्रीय सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. यामध्ये 42 आरोग्य पर्यवेक्षक काम पाहणार आहेत अशी माहिती अमोल गिते (जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा) यांनी दिली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply