Buldhana : बुलढाण्यातील उत्खननात आधी पुरातन मंदिर आता विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती; लोकांमध्ये उत्सुकता वाढली

Buldhana : बुलढाण्यातील सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसरात जीर्णोद्धार जतन आणि संवर्धनाचं काम सुरु आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून उत्खननाचं काम सुरु आहे. या उत्खननात मागील महिन्यात पुरातन शिवमंदिर आढळलं होतं. त्यानंतर आता याच ठिकाणी शेषशाही विष्णू भगवान आणि लक्ष्मीची मूर्ती सापडली आहे. ही इतिहासातील सर्वात सुंदर मूर्ती बोलले जात आहे.

सिंदखेड राजा शहरातील लखुजीराव जाधव यांच्या समाधीच्या परिसरात उत्खननाचं काम सुरु असलेल्या परिसरात शेषशाही विष्णू भगवान व लक्ष्मीची साडेतीन ते चार फूट उंच शेष नागावर आसनस्थ असलेली अत्यंत सुरेख आणि रेखीव मूर्ती सापडली आहे.

Nashik : ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा कोकणेंच्या गाडीवर हल्ला, मोठा दगड टाकून काच फोडली

बुलढाण्यात सापडलेली मूर्ती इतिहासातील सर्वात सुंदर असल्याचे बोललं जात आहे. आता सर्व परिसरात अत्यंत बारकाईने उत्खनन करणार असल्याचे भारतीय पुरात्व विभागाचे अधीक्षक अरुण मलिक यांनी सांगितलं.

महिन्यापूर्वी आढळलं पुरातन मंदिर

दरम्यान, काही आठवड्यांपूर्वी राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खनाना पुरातन शिवमंदिर आढळले होते. तेराव्या शतकातील यादवकालीन शिव मंदिर असल्याचा दावा काहींनी केला होता. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्याने पाहणी केली होती.

यावेळी राजे लखोजीराव जाधव यांच्यासह तीन मुले आणि नातू यांच्या समाधीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभागाकडून उत्खनन करणे आजही सुरु आहे. या ठिकाणीच यादवकालीन शिवमंदिर उत्खनन करताना आढळले. या मंदिरात महादेवाची मोठी पिंड आहे. हे मंदिर दगडाने बांधलेले आहेत. मंदिराच्या खाली फरशी सुद्ध आहे. आता पूर्ण परिसरात उत्खनन झाल्यानंतर या मंदिराचं गुपीत समोर येऊ शकतात, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply