Buldhana News : अज्ञात वाहनाची कारला धडक, डॉक्टर मुलासह आईचा जागीच मृत्यू

Buldhana News : नववधूच्या घरी होळीचा सण साजरा करून परतीच्या वाटेवर असलेल्या अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील माळोदे कुटुंबावर काळाने झडप घातली. ज्ञात वाहनाच्या धडकेत कारमधील डॉक्टर मुलासह आईचा जागीच मृत्यू झाला आहे. तर वडील गंभीर स्वरूपाने जखमी झाल्याची घटना खामगाव बाळापुर मार्गावरील हॉटेल सुदर्शन ढाब्याजवळ 31 मार्च रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान घडली आहे.

मिळाल्या माहितीनुसार, बाळापूर येथील रहिवासी रामराव लक्ष्मण माळोदे यांचा मुलगा दंत शैल्य चिकित्सक डॉ. निलेश रामराव माळोदे (२७) याचा विवाह इंदोर येथील एका मुलीशी ठरला होता. सदर नववधूला होळीचा सण साजरा करण्यासाठी रामराव लक्ष्मण माळोदे, डॉ. निलेश रामराव माळोदे व संगीता रामराव माळोदे हे तिघे कार इंदोर येथे गेले होते.

Pune Voters Banner : मतदारांशी 5 वर्ष प्रामाणिक राहीन, दुसऱ्या पक्षात गेल्यास पुन्हा निवडून देऊ नका; पुणे शहरात रंगली बॅनरची चर्चा

यातच कार्यक्रम आटपून आज संध्याकाळी परत बाळापूर येथे येत असताना गावाच्या वेशीवर पोहोचताच त्यांच्या कारवर काळाने घाला घातला. अकोला येथील खामगावच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला समोरून धडक दिली. या धडकेत कार तीन ते चार वेळा पालटली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली.

या अपघातात डॉ. निलेश माळोदे व त्याची आई संगीता माळोदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर वडील रामराव माळोदे हे गंभीर स्वरूपाने जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तातडीने खामगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारात दाखल केले आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply