Buldhana Crime News : जप्त केलेला तब्बल ४५९ किलो गांजा नष्ट; बुलढाणा जिल्ह्यात पोलिसांची कारवाई

Buldhana Crime News : बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत पकडलेला तब्बल ४५९ किलो गांजा नष्ट करण्यात आला. खामगाव  शहरातील एमआयडीसी भागातील वाईज इन्फोकेअर अँड फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये काल दिवसभरात हा गांजा नष्ट करण्यात आला. 

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांकडे दाखल गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेला गांजा अंमली पदार्थ गोदामात ठेवण्यात आला होता. जप्त करण्यात आलेल्या गांजाचे काय करायचे याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु होती. न्यायालयीन स्तरावर पाठपुरावा करून याबाबत पोलिसांनी नष्ट करण्याबाबत अखेर आदेश मिळविल्यानंतर हा गांजा खामगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील वाईज इन्फो केअर अँड फार्माटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये नष्ट करण्यात आला. 

Forest Department Action : ९० हजारांचे लाकूड जप्त; वन विभागाची कारवाई, चालक पसार

सदर प्रक्रिया सुरू असताना प्रदुषण होणार नाही व आजूबाजूच्या लोकांना त्याचा त्रास होणार नाही; याबाबत सर्व दक्षता घेण्यात आली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत सातव, आर्थिक गुन्हे शाखा पथक ठाणेदार अशोक लांडे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *