Buldhana Bus Accident : बुलढाण्यात भीषण अपघात! खासगी बस १०० फूट दरीत कोसळली; २८ जखमी

Buldhana Bus Accident : बुलढाणामधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. इंदोरहून अकोल्याकडे जाणारी खाजगी प्रवासी बस दरीत कोसळल्याची घटना घडली. या अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व प्रवासींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सच्या बसचा बुलढाण्यात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. बुलढाण्यामधील जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील करोली घाटात खासगी बस १०० फुट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. सकाळी बस इंदोर येथून अकोलाकडे जात असताना साडे पाच वाजता हा अपघात झाला.

Mumbai Crime News : मुंबईत १२ वर्षाच्या मुलावर ४ अल्पवयीन मुलांकडून अत्याचार; धक्कादायक घटनेने खळबळ

जळगाव जामोद - बुऱ्हाणपूर मार्गावरील दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झाले. घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातातील अपघातात २८ जण जखमी झाले असून, सर्व खमींवर दर्यापूर (मध्यप्रदेश ) व बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खासगी बसला आग..

मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर आढे गावाच्या हद्दीत खासगी ट्रॅव्हल बसला अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी नाही. बस मधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसचा टायर फुटल्याने बसला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply