Buldhana Accidnet : पुण्याला निघालेल्या खासगी बसचा टायर फुटला, कळमनुरीतील 12 प्रवासी जखमी

Buldhana  : हिंगोली येथून पुण्याला निघालेल्या एका खासगी बसचा टायर फुटल्याने सुमारे 12 प्रवासी जखमी झाले. सर्व जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व जखमी प्रवासी कळमनुरी येथील आहेत. 

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी - लोणार तालुक्यातील वेणी फाट्या जवळ बसचे पुढील टायर फुटले व रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खड्यात जाऊन बस धडकली. या अपघातात बसमधील 12 प्रवासी जखमी झाले.

हा अपघात रात्रीच्या सुमारास झाला. त्यामुळे अंधारात मदत कार्य करण्यात अडथळा येत हाेता. या बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णवाहिका आणि पोलीस जीप या वाहनांतून लोणार येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखस केले. या अपघातात बसचे माेठे नुकसान झाले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *