Bopdev Ghat Case : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण, पोलिस तपासातून धक्कादायक माहिती उघड

Bopdev Ghat Case : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये मोठी अपेडट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. आरोपीने स्वतःचे आणि फरार आरोपीचे खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासातून उघड झाले आहे. पोलिस सध्या या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. याप्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख याच्या वडिलांचे नाव जमाल लखपती असे असून त्याने खोटे नाव सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने फरार साथीदाराचे नाव बाप्या ऊर्फ सोमनाथ यादव असे असल्याचे सांगितले. मात्र त्याचे मूळ नाव बाप्या ऊर्फ सूरज दशरथ गोसावी असे असल्याचे पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणातील आरोपी सध्या येवरडा तुरूंगामध्ये आहेत.

Jalgaon Bus Accident : दोन बसचा समोरासमोर अपघात; २५ प्रवासी जखमी, कन्नड- चाळीसगाव बायपास रोडवरील घटना

आरोपी पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे लक्षात आल्यानंतर येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले आरोपी शोएब ऊर्फ अख्तर बाबू शेख (वय २७, रा. आदर्शनगर, मंतरवाडी, उरुळी देवाची) आणि चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०, रा. होलेवस्ती, उंड्री) यांना पोलिसांनी सोमवारी रात्री ताब्यात घेतले आहे. या दोन्ही आरोपींची पोलिस चौकशी करत आहेत. पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेवून आरोपींची यापूर्वी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. दोन्ही आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply