Bomb Blast Threat : देशभरात बॉंम्बस्फोट घडवण्याचा इशारा, PM मोदींना जीवे मारण्याची धमकी... पुण्यात खळबळ

Pune : पुण्यातील एका रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या मेलवर देशात बॉम्बस्फोट होण्याच्या धमकीची कमेंट आल्याने एकच खळबळ उडाली आहे. भारतात विविध ठिकाणी बॉंम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून देण्याची धमकी या कमेंटमधून देण्यात आली. या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात एक व्यक्ती उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारासाठी आलेला व्यक्ती एक वेबसाईट चालवतो. या वेबसाईटवर देशात बॉम्बस्फोट होण्याच्या धमकीची कमेंट आल्याने एकच गोंधळ उडाला.

Ajit Pawar : सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी घेतला पुण्याच्या प्रकल्पांचा आढावा

"मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करत असून हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे," असा मजकूर या मेल मध्ये होता. तसेच देशात अनेक ठिकाणी बॉंम्बस्फोट घडवणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही बॉंम्बने उडवण्याची धमकी या कमेंटमधून देण्यात आली.

या सगळ्या प्रकारानंतर ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता त्यांनी तात्काळ पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला याबाबत माहिती दिली. या व्यक्तीच्या तक्रारीवरुन अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply