BMC : आयुक्तांच्या बंगल्यावरील कर थकबाकी आरोपावर मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण

BMC : मुंबईच्या आयुक्तांच्या बंगल्याची मागील १४ वर्षांपासून कर थकबाकी ही ४.५६ लाख असल्याचे समोर आलं. त्यानंतर विरोधकांकडून मुंबई महापालिकेवर टीका करण्यात आली. यानंतर मुंबई महापालिकेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांच्या बंगल्याची अर्थात महानगरपालिका आयुक्त बंगल्याची सुमारे ४ लाख ५६ हजार रुपयांची थकबाकी असल्याचे आरोप प्रसारमाध्यमांवर करण्यात येत आहे. सोशल मीडियावरही पालिकेवर भरपूर टीका आहे. मात्र सदर आरोप वस्तुस्थितीशी विसंगत आहे. याबाबत जनतेत गैरसमज पसरू नयेत, असं स्पपष्टीकरण पालिकेकडून देण्यात आलं आहे.

Maharashtra Politics : "कहो दिल से, नितीन गडकरी फिर से"; भित्तीचित्र रंगवत गडकरींनी प्रचाराचा फोडला नारळ

मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येते की, मुंबई महानगरपालिका आयुक्तांच्या बंगल्याचा मालमत्ता कर रकमेचे देयक दिनांक ५ मार्च २०२४ रोजी प्रसारित करण्यात आलं होतं. मालमत्ता कराचे देयक प्रसारित झाल्यापासून त्याचा भरणा करण्याची मुदत तीन महिन्यांची असते.

यानुसार सदर देयक भरण्याची अंतिम मुदत ही दिनांक ५ जून २०२४ ही आहे. तसेच कर देयक ४ लाख ५६ हजार इतका भरणा आहे. याबाबत कार्यवाही महानगर पालिकेने सुरु केली आहे. आयुक्तांच्या बंगल्याचा कर येत्या दोन ते तीन दिवसांत जमा होईल. याबाबत जनमानसात गैरसमज पसरू नये, असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आयुक्त कार्यालयाकडे 29 डिसेंबर 2023 रोजी अर्ज करत मुंबई महानगरपालिका आयुक्त यांनी आपल्या बंगल्यावर पाणी सुविधांसाठी केलेला खर्चाबाबत मागील 5 वर्षांची माहिती दिली. प्रत्येक महिन्यानुसार एकूण पाणी आकार खर्च याची माहिती मागितली होती.

अनिल गलगली यांचा अर्ज आयुक्त कार्यालयाने डी विभागाच्या जलखात्याकडे हस्तांतरित केला. जल खात्याने अर्ज करनिर्धारक व संकलक खात्याकडे हस्तांतरित केला. अनिल गलगली यांस 31 मार्च 2024 पर्यंतची माहिती दिली. 1 एप्रिल 2010 पासून 31 मार्च 2023 पर्यंतची थकबाकी 3.89 लाख होती. त्याचबरोबर 1 एप्रिल 2023 पासून 31 मार्च 2024 पर्यंतचे चालू बिल देयक 67, 278 इतकं आहे. यात सर्वसाधारण कर आणि जल कराचा देखील समावेश आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply