पंजाब : मोठी बातमी! सिद्धू मुसेवालाला मारणारे दोन शूटर्स पुण्यातले; फोटोवरून पटली ओळख

पंजाब : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांना गोळ्या मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. या ८ शूटर्सचे फोटो हाती लागले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ८ पैकी दोन शूटर्स हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील आहे. संतोष जाधव आणि सौरव महाकाळ अशी या आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी पुण्यातील रहिवाशी आहेत. 

मुसेवालाची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शुटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. 3 शूटर्स पंजाबमधील होते. २ महाराष्ट्रातले, २ हरियाणातले, आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता. पंजाबचा गायक सिद्धू मुसेवाला यांची गेल्या रविवारी (२९ मे) गोळ्या झाडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू झाला होता.

पंजाबच्या मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर केलेल्या गोळीबारात सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू झाला होता. मुसेवाला (२७) हे जवाहर के या त्यांच्या खेड्यात जीपमधून जात असताना झालेल्या AK 47 या बंदुकीने केलेल्या गोळीबार करण्यात आला. त्यावेळी ३२ राऊंड फायर करण्यात आले. त्यात त्यांच्या शरीरात १६ गोळ्या लागल्या. या घटनेमुळे हत्येने पंजाबमध्ये खळबळ उडाली होती.

दरम्यान, आता या हत्येप्रकरणात सहभागी असलेल्या ८ आरोपींची ओळख पडली असून त्यातील दोन आरोपी हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील असल्याची माहिती आहे. यातील संतोष जाधव हा सराईत गुन्हेगार असल्याची माहीती आहे. गेल्या वर्षी आंबेगाव तालुक्यातील मंचरजवळ एकलहरे–फकीरवाडी येथे सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या बाणखेले (वय २६) याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात संतोष जाधव याचा समावेश होता.

याआधी दिल्ली पोलिसांच्या चौकशीदरम्यान कुख्यात गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईने गुन्ह्याची कबुली दिली. माझ्याच गँगच्या माणसांनी मूसेवालाची हत्या केली, असं तो म्हणाला. “कॉलेजमध्ये असल्यापासूनच विक्की मिद्दुखेडा माझा मोठा भाऊ होता, माझ्या ग्रुपने त्याच्या हत्येचा बदला घेतला आहे,” अशी कबुली लॉरेन्सनं दिली होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply