Bhyandar D-Mart Fire : रजा नाकारल्याने तरुणीला राग अनावर; थेट डी-मार्टमध्येच लावली आग, खळबळजनक घटना!

Bhyandar News : बॉसने आपल्याला सुट्टी न दिल्याने संतप्त झालेल्या एका महिला कर्मचारीने संतापजनक कृत्य केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. या संतप्त महिला कर्मचारीने भाईंदरच्या डी-मार्टमध्येच आग लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी २३ वर्षीय तरुणीवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही तरुणी भाईंदर पश्चिमेच्या मुख्य डीपी रोडवरील डी मार्टमध्ये कामाला होती. तिला काही महत्वाच्या कामासाठी सुट्टी हवी होती मात्र व्यवस्थापनाकडून सुट्टी नाकारण्यात येत होती. त्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून नाराज होती.

Mumbai : मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकात नवीन 40 चारचाकी,184 दुचाकी समाविष्ट... गृहमंत्र्याकडून लोकार्पण

गुरुवारी तिने पुन्हा एकदा सुट्टीसाठी अर्ज केला. मात्र तिची सुट्टी मंजूर करण्यात आली नाही. त्यामुळे या संतप्त तरुणीने रागाच्या भरात डीमार्ट मधीलपहिल्या मजल्यावरील कपडे आणि खेळणी ठेवलेल्या भागाला चक्क आग लावली. आग लागल्याने डी मार्ट मध्ये एकच घबराट पसरली. यावेळी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक उपकरणांनी आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत जवळपास २० हजाराचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी स्टोर व्यवस्थापक यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply