Bhushi Dam : भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये, अनधिकृत टपऱ्यांवर फिरवला बुलडोझर

Pune : भुशी डॅम परिसरातील धबधब्यावर एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेल्याच्या घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. या घटनेनंतर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. लोणावळ्यातील भुशी डॅमजवळील अनधिकृत टपऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करत बुलडोझर फिरवला आहे. भुशी डॅप दुर्घटनेनंतर लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार,भुशी डॅमजवळ असलेल्या अनधिकृत टपऱ्यांवर अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे. भुशी डॅपजवळ अनेक खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या टपऱ्या उभारण्यात आल्या होत्या. या सर्व टपऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. भुशी डॅम दुर्घटनेनंतर प्रशासनाने ही कारवाई करण्याचा निर्णय घेतला. लोणावळ्यात दोन कुटुंब वाहून गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर झोपलेल्या प्रशासनाला जाग आली.

Zika Virus In Pune : चिंता वाढली! पुण्यात झिका रुग्णाची संख्या पोहोचली ६ वर; २ गरोदर महिलांनाही लागण

मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला २४ तास उलटायच्या आतच प्रशासनाने पर्यटनस्थळावरील अनधिकृत अतिक्रमण हटवायला सुरुवात केली आहे. भुशी डॅप परिसरात पर्यटनाला अडसर ठरणारी छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. भविष्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबियांसारखी दुर्घटना घडू नये आणि त्याला ही अतिक्रमणे जबाबदार ठरू नयेत म्हणून प्रशासनाने तातडीनं कारवाई करण्याचा निर्णय घेतला. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल मंडळ प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली.

 दरम्यान, लोणावळ्यातील प्रसिद्ध लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट आणि शिवलिंग पॉइंट या ठिकाणी संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच पर्यटकांना जाता येणार आहे. संध्याकाळी ६ वाजल्यानंतर या पर्यटनस्थळावर जाण्यास पर्यटकांना बंदी असणार आहे. नियमांचे उल्लघन करणाऱ्यांविरोधात कारवाई देखील केली जाणार आहे. लोणावळ्यातील अनेक धबधब्यांवर जाण्यासाठी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. अन्सारी आणि सय्यद हे कुटुंब वाहून गेल्याच्या घटनेनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. लोणावळ्यातील अनेक ठिकाणी ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply