Bhavesh Bhinde : घाटकोपर दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेवर बलात्काराचा गुन्हा, खळबळजनक माहिती समोर

Bhavesh Bhinde : घाटकोपरमध्येकोसळलेल्या होर्डिंगचा मालक भावेश भिंडे आहे. दुर्घटनेनंतर त्याच्याविरूद्ध मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. त्याला याप्रकरणी ६ कोटींचा दंड ठोठावल आहे. आता भिंडेविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे. घटनेनंतर भावेश भिंडे फरार आहे. त्याच्याविरुद्ध याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा भावेश भिंडे मालक आहे. त्याच कंपनीचं होर्डिंग घाटकोपरमध्ये लावलेलं होतं. होर्डिंग पडल्यानंतर पोलिसांनी भिंडेविरोधात गुन्हा दाखल केलाय. त्याचं घर मुलुंड येथे असल्याची माहिती मिळतेय. घटनेनंतर त्याचा फोन देखील बंद आहे. फरार भिंडेचा पोलीस शोध घेत आहेत. २००९ साली भिंडेने आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्याच्याविरूद्ध २१ गुन्हे दाखल असल्याचं तेव्हा समोर आलं होतं.
 
घाटकोपरमध्ये  झालेल्या दुर्घटनेत गेल्या दोन दिवस बचावकार्य मोठ्या शर्थीने सुरू आहे. आज सकाळी त्याच पेट्रोल पंपावर आग लागल्याची दुर्घटना घडली. मात्र अग्निशामक दलाकडून ही आग तातडीने विझविण्यात  आली आहे. घटनास्थळी अजूनही बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळालं. एनडीआरएफने दिलेल्या माहितीनुसार अजूनही बचाव कार्य सुरू आहे. गील्डर एक हा उचलण्यात आला आहे. गील्डर दोन उचलण्याचे काम सध्या सुरू आहे. एका बिल्डरखाली एक कार अडकली आहे. त्या कारमध्ये दोन व्यक्ती असल्याची माहिती सध्या एनडीआरएफने दिलेली आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply