Bhandara News : ट्रक चालकांच्या संपाचा बस प्रवाशांना फटका; भंडारा आगाराच्या २५० फेऱ्या रद्द

Bhandara News : केंद्र सरकारने चालकाच्या हातून अपघात झाल्यास १० वर्षाची शिक्षा असा नियम आजपासून लागू केला आहे. या विरोधात राज्यभरात ट्रक चालकांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा फटका  एसटी महामंडळाला देखील बसला असून यामुळे  भंडारा जिल्ह्यातील २५० बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. 

चालकांसाठी नवीन कायदा अस्तित्वात आणण्यात येत आहे. चालकांच्या हातून अपघात घडून त्यात कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांना सरळ १० वर्षाचा कारावास आणि द्रव्य दंडाची शिक्षा ठेवण्यात येणार आहे. याच्या विरोधात ट्रक चालकांनी नागपूर- कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर नागपूर जिल्ह्यात बंद पुकारला आहे. ट्रक चालकांनी पुकारलेल्या बंदचा फटका थेट भंडारा आगारातून सुटणाऱ्या बसवर पडला आहे. भंडारा आगारातील नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या सकाळपासून सुमारे २५० बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. 

Japan Earthquake : नवीन वर्षाची भयंकर सुरुवात, जपानमध्ये ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप, त्सुनामीचाही इशारा

सात लाखांचे नुकसान 

नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या बस  फेऱ्या रद्द झाल्याने सुमारे सात लाखांचा फटका भंडारा आगाराला बसला असून यात प्रवाशांचीही गैरसोय होत आहे. बराच वेळपर्यंत प्रवाशांना नागपूरच्या दिशेने कुठलीही बस मिळाली नसल्याने अनेकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply