Bhandara Heavy Rain : भंडाऱ्यात पुन्हा संततधार पाऊस; अनेक घरांमध्ये शिरले पाणी, राज्य मार्गावरही साचले पावसाचे पाणी

Bhandara : भंडाऱ्यात आज पुन्हा सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. यामुळे भंडारा- तुमसर राज्य मार्गावर पाणी साचल्याचे दृश्य दिसत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीस अडचणी येत आहेत. तर शहरातील वैशाली नगर व रुख्मिनी नगर येथे घरांत पाणी शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

विदर्भात पावसाचा जोर कायम असल्याचे पाहण्यास मिळत आहे. भंडारा जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून लाखनी तालुक्यातील ग्राम किन्ही येथे पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरला आहे. तर सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे गावातील गाई- म्हशीचे गोटे कोसळले  तर घरे देखील कोसळले आहेत. ग्रामपंचायतने गावातील नाल्याची सफाई न झाल्यामुळे रोडवर पाणी येत आहे. तर अनेकांच्या घरात पाण्याने शिरकाव केला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांच्या घरात पाणी गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय भंडारा- तुमसर मार्गावर देखील आणि आले आहे. या सर्व परिस्थितीमुळे पुन्हा एकदा तुमसर नगर परिषदेच्या ढिसाळ कारभार सामोर आल्याचे दृश्य दिसत आहे. 

Maharashtra Governor : मोठी बातमी! सी.पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; हरिभाऊ बागडेंकडे राजस्थानचा पदभार

आज भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून मागील तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर काल रात्रीपासून भंडारा जिल्हात मुसळदार पावसाने हजेरी लावली केली आहे. यामूळे आज सकाळपर्यंत भंडारा शहरातील वैशाली नगर व रुख्मिनी नगर येथे किराणा दुकान आणि नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नगर परिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे दर वर्षी नागरीकांना त्रास सहन करावा लागत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply