Bhandara Accident : कामावर जाणाऱ्या मजुरांच्या वाहनाला भीषण अपघात; २ मजुरांचा जागीच मृत्यू, तिघे जखमी

Bhandara : बांधकाम करणाऱ्या मजुरांना घेऊन गाडी मार्गस्थ झाली असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सदरचा अपघात लाखनी- पालांदूर मार्गावर पालांदूर जवळील गुरढा येथे घडला आहे. जखमींना लागलीच जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातून काही मजूर बाहेर कामासाठी जात असतात. रोजप्रमाणे आज देखील सकाळी मजूर गाडीने जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान कामावर मजूर नेत असताना समोरून येणाऱ्या ट्रक चालकाने भरधाव ट्रक चालवित समोरून येणाऱ्या चारचाकीला जोरदार धडक दिली. यात गाडीत असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना लाखनी तालुक्यातील गुरढा येथे घडली.

Pune : गजा मारणेच्या टोळीची दादागिरी, तरूणाला रस्त्यात लाथा बुक्क्यांनी अन् पट्ट्याने बेदम मारहाण

कामावर जाताना अपघात

कांद्री तालुका तुमसर येथे नाली बांधकामाकरिता चारचाकी वाहानाने हे मजूर पालांदूर जात होते. लाखनीमार्गे गुरढावरून पालांदूरकडे येत असलेल्या ट्रकने समोरील वाहनाला धडक दिली. यात वाहन प्रदीप प्रमोद बाईन (वय ४३, रा. चामोर्शी जि. गडचिरोली) तसेच प्रमोद ऋषी पुस्तोडे (वय ४२, रा. एगाव ता. अर्जुनी/मोर. जि. गोंदिया) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.

ट्रक चालकावर गुन्हा दाखल

तसेच अपघातात एगाव (ता. अर्जुनी/मोर जि. गोंदिया) येथील कालिदास बी. पंधरे (वय ३६), दिनेश बनकर (वय २८) निशांत मेश्राम (वय २१) हे गंभीर जखमी झाले आहे. तिन्ही जखमींना जिल्हा रुग्णालय भंडारा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ट्रक चालक दिलीप बिसेन याचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पालांदूर पोलीस करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply