Bhandara | भंडाऱ्याच्या वैनगंगा नदी पुलाची दुरावस्था, प्रवाशांचा जीव धोक्यात

महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवरील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाची दुरावस्था समोर आली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून ते वाहतुकीसाठी जीवघेणे ठरत आहेत. सदर पूल राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. दररोज शेकडो नागरिक या पुलावरून प्रवास करतात. अवजड वाहनांसह मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असतानाही पुलावरील खड्ड्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळते. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळीही या मार्गावर वाहतूक सुरू असते. मात्र महामार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे वाहनचालकांना अंधारात प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यता वाढली असून स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी तसेच पथदिवे सुरू करून सुरक्षित वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी केली आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *