Wainganga River Flood : वैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी; कारधा छोट्या पुलावर पाणी आल्याने पुल केला बंद

Bhandara : भंडारा जिल्ह्यात मागिल चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात पावसाची संततधार सुरू असल्याने वैनगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे भंडारा जवळील कारधा छोट्या पुलावर पाणी असल्याने हा पुल बंद करण्यात आला आहे.

राज्यातील बहुतांश भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. कुठे मुसळधार पाऊस होत आहे. तर कुठे पावसाची रिपरिप सुरु आहे. यामुळे अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान  भंडारा जिल्ह्यात देखील हीच परिस्थिती असून मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जिल्ह्यातून गेलेल्या वैनगंगा नदीला पूर आला आहे. तर महाराष्ट्र, मध्यप्रदेशच्या सुमावर्ती भागात देखील पावसाचा जोर कायम  असल्याने वैनगंगा नदीने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Pune : खडकवासला धरण साखळी ६१ टक्के भरली, १७.८२ टीएमसी इतका पाणीसाठा जमा

नदी काठच्या गावांना इशारा

पावसाचा जोर कायम असल्याने भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणात पाण्याची आवक वाढली आहे. धरणातील पाणीसाठा वाढत असल्याने आता गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असून प्रशासनाच्या वतीने नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर कारधा छोट्या पुलावर देखील पाणी आल्याने हा पूल रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply