Bhagat Shingh Koshyari Resign : राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर, रमेश बैस नवे राज्यपाल

Bhagat Shingh Koshyari : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.

याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात मोठं रान उठलं होतं. राज्यपालांना तातडीने पदावरून दूर करा, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती.

कोश्यारींनी राजीनाम्याची व्यक्त केली होती इच्छा

भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी पत्र लिहिले होते. वारंवार केल्या जाणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांनंतर कोश्यारी यांना मोठा विरोध झाला होता. अखेर आज त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.

कोण आहेत रमेश बैस?

बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून पदभार सांभाळला आहे. 

जुलै 2019 ते जुलै 2021 त्रिपुराचे राज्यपाल.

रायपूर लोकसभेचे सहा वेळा खासदार.

ऑक्टोबर 1999 ते सप्टेंबर 2000 केंद्रीय रसायन राज्यमंत्री.

सप्टेंबर 2000 ते जानेवारी 2003 केंद्रीय सूचना प्रसारण राज्यमंत्री.

जानेवारी 2004 ते मे 2004 केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री.

राज्यपालाची नियुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते. राष्ट्रपती पदासाठी पात्रता म्हणून ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत. सर्वसाधारणपणे राज्यपालाचा कार्यकाल ५ वर्षाचा असतो. पाच वर्षांची मुदत संपल्यावर त्याची त्याच पदावर पुन्हा नियुक्ती सुद्धा राष्ट्रपती करु शकतात. शिवाय राज्यपालाला पदावरुनही हटवू शकतात.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply