BEST Bus Accident : देवेंद्र फडणवीसांकडून ५ लाखांची मदत, बेस्ट अपघातप्रकरणी दोषींवर कारवाईचा आदेश

Mumbai : कुर्लामध्ये झालेल्या बेस्ट बस अपघात प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलेय. कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असे देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलेय. त्याशिवाय मृताच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून पाच लाख रूपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. कुर्ला येथील बेस्ट बस अपघातामध्ये आतापर्यंत सहा जणांनी आपला जीव गमावला आहे. या अपघातामध्ये ४९ जण जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. जखमींवर सायन आणि भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती अतिशय चिंतानजन असल्याचं समोर आलेय. त्यामुळे मृताची संख्या वाढू शकते.

कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.

CM Devendra Fadnavis : खुशखबर! मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर, १.५ लाख सरकारी नोकऱ्यांची केली घोषणा!

या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

कुर्ला रेल्वे स्थानक परिसरात एस जी बर्वे रोड येथे भरधाव बेस्ट बसनं अनेक लोकांना चिरडल्याची तसंच या अपघातात काहींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आहे. मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. सर्वांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply