Beed News : 'तुझा संतोष देशमुख करतो' गाडी अडवत कोयत्यानं सपासप वार; डोकं अन् मानेतून रक्ताच्या धारा

Beed News : शेतीमधील बांधाच्या वादावरून बीडमध्ये मारहाणीचा प्रकार घडला आहे. 'तुझा संतोष देशमुख करतो', अशी धमकी देत भररस्त्यात आरोपीने तरूणावर कोयत्याने सपासप वार केले. शरीरावर १०० हून अधिक गंभीर वार असल्याची माहिती आहे. तरूणाची स्थिती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे इतक्या गंभीर हल्ल्यानंतरही बीड ग्रामिण रूग्णालयात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

कैलास सांगुळे असं जखमी तरूणाचं नाव आहे. तो बीड तालुक्यातील तांदळवाडी भिल्ल येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. कैलास गाडी चालवत होता. यादरम्यान, चार जणांनी त्याची वाट अडवली. तसेच कोयत्याने डोक्यावर, मानेवर आणि तोंडावर जबरदस्त हल्ला केला. हल्लेखोरांनी ‘तुझा संतोष देशमुख करतो, याला जीवे मारा’ अशी धमकी देत त्याला मारहाण केली. हल्ला झाल्यानंतर तरूण बेशुद्ध अवस्थेत पडला.

Akkalkuwa : पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; संस्था चालकांचा बेजाबदारपणा, ७० विद्यार्थ्यांना ट्रकमध्ये कोंबून २०० किलोमीटरचा प्रवास

 

यानंतर त्याच्या भावाने घटनास्थळी धाव घेत भावाला बीडमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. कैलासवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

यानंतर कुटुंबाने पोलिसांवर गंभीर आरोप करीत आक्रोश व्यक्त केला आहे. “माझ्या भावाचं काही बरं वाईट झालं तर याला जबाबदार पोलीस प्रशासन असेल,” असं म्हणत कुटुंबाने प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोपी मोकाट असून, पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नसल्यामुळे त्यांची भूमिका संशयास्पद ठरत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *