Beed News : वाल्मिक कराडच्या समर्थकांचा बीडमध्ये गुंडाराज, हॉटेल मालकाला लाकडी दांडके आणि बेल्टनं झोडलं; कारण फक्त..

Beed News : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये गुंडाराज सुरू आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच बीडमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका हॉटेल मालकाला आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करतानाचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. विशेष म्हणजे मारहाण करणारी टोळी वाल्मीक कराड समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे.

बीडच्या चऱ्हाटा रोडवर शिवमुद्रा हॉटेल आहे. या हॉटेल मालकाला क्षुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आठ ते दहा जणांच्या टोळक्याकडून हॉटेल मालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. लाकडी दांडके आणि बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली असून, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Mumbai Local : मुंबई एसी लोकलमधील बत्ती गुल; भर पावसात उकाड्याने प्रवाशी घामाघूम

दरम्यान, ही टोळी वाल्मीक कराड समर्थक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून अधिक संताप व्यक्त करण्यात येत आहे. टोळक्याकडून करण्यात आलेल्या मारहाणीत पालवन येथील अविनाश अनुरथ साबळे, नितीन अनुरथ साबळे आणि अमोल भगवान लोखंडे गंभीररित्या जखमी झाले आहेत.

मारहाण झाल्यानंतर जखमींना तातडीने बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे. दरम्यान, पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. या गुन्ह्यात अक्षय साखरे, गजानन दहिफळे, सनी शिंदे सह इतर आरोपींचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply