Beed News : "शेतासाठी अडवलेले पाणी का घेतले?" जाब विचारताच शेतावर बाप लेकाच्या डोक्यात दगड घातला; बीडमध्ये खळबळ

Beed News : शेतासाठी पाण्याच्या वादातून बाप लेकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यात दगड मारल्यानं अण्णासाहेब अर्जुन पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांचा मुलगाही जखमी झाला आहे. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शेतासाठी अडवलेले आमचे पाणी का घेतले?

अण्णासाहेब अर्जुन पवार असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शेतासाठी अडवलेले आमचे पाणी का घेतले? असे विचारल्याने बाप लेकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अभिषेक गाडे, रामप्रसाद गाडे आणि गोकुळ गाडे या तिघांनी अण्णासाहेब पवार आणि त्यांच्या मुलावर हल्ला चढवला.

MHADA Home : ठाण्यात म्हाडाकडून बंपर लॉटरी! प्राइम लोकेशनवर ११७३ घरे; तर कल्याणामध्ये २,५०० घरांची विक्री

हल्ल्यात अण्णासाहेब पवार यांच्या डोक्यात दगड मारल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा मुलगाही मारहाणीत जखमी झाला आहे. या घटनेनंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी ठाण्यात अभिषेक गाडे, रामप्रसाद गाडे आणि गोकुळ गाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी या प्रकरणाच्या सखोल तपासाला सुरूवात केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply