Beed : ऊसताेड मजूर कुटुंबावर काेसळली कु-हाड; बीडच्या हुतात्मा उमेश मिसाळ यांना हजाराे युवकांचा साश्रु नयनांनी निराेप

Beed : वीर जवान तुझे सलाम, भारत माता की जय अशा घाेषणा देत आज (गुरुवार) जवान उमेश मिसाळ यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळगावी काेल्हेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. परिसरातील हजाराे ग्रामस्थांनी त्यांनी अखेरचा निराेप दिला. अवघ्या 22 व्या वर्षी उमेश मिसाळ हे देश सेवेत असताना हुतात्मा झाल्याने त्यांच्या अंत्ययात्रेत माेठ्या संख्येने युवा वर्ग सहभागी झाला हाेता.

बीडच्या केज तालुक्यातील कोल्हेवाडी येथील जवान उमेश मिसाळ यांचा राजस्थान मधील सुरतगड येथे भूमिगत वीज वाहिनीचा धक्का लागून सोमवारी मृत्यू झाला. उमेश मिसाळ हे दाेन वर्षांपूर्वी 25 मराठा बटालियनमध्ये सैनिक म्हणून भरती झाले होते. अवघ्या 22 व्या वर्षी त्यांना वीरमरण आल्याने बीड जिल्ह्यात शाेककळा पसरली.

Nanded Accident : नांदेडमध्ये भीषण अपघात! प्रवासी व्हॅन - टॅम्पोची समोरासमोर धडक; ४ जणांचा मृत्यू

आज सकाळी एका सजवलेल्या डंपरमध्ये जवान उमेश मिसाळ यांचे पार्थिव ठेवण्यात आले. यावेळी निघालेल्या अंत्ययात्रेत युवा वर्ग माेठ्या संख्येने सहभागी झाले हाेते. वीर जवान तुझे सलाम, भारत माता की जय अशा घाेषणांनी काेल्हेवाडी गाव दणाणून गेले.

खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह मान्यवरांनी जवान उमेश मिसाळ यांना आदरांजली वाहिली. जवान उमेश मिसाळ यांच्यावर भावपुर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *