Beed Farmer End Life: पावसाअभावी शेतातील पीक करपू लागले, चिंताग्रस्त शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Beed News: ऑगस्ट महिना संपत आला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस (Rainfall) झाला नाही. पाऊस न झाल्यामुळे शेतातील पिकं करपायला लागली आहेत. काही ठिकाणी पाण्याअभावी पिकं मान खाली टाकू लागले आहेत. यामुळे चिंतेत आलेल्या बीडमधील एका शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलंत शेतामध्येच आत्महत्या केली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघात ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी ज्ञानोबा ढाकणे (४५ वर्षे) असंआत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते परळीच्या वैजवाडी या गावामध्ये राहत होते. पावसाअभावी शेताताली पिकं माना टाकून देत असल्यामुळे बालाजी ढाकणे चिंतेत आले होते. त्यांनी शेतातील पिकासमोरच गळफास लावून आत्महत्या केली. जुलै महिन्यापासून सर्वदूर पाऊस नाही, यामुळे उभी पिकं मान टाकून देत आहेत. यामुळे आता शेतामध्ये पीक येणार नाही, घेतलेलं कर्ज कसे फेडावं ? या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली.

India Alliance News: इंडिया आघाडीची ताकद वाढली, आणखी दोन पक्ष झाले सहभागी

बालाजी ढाकणे या शेतकऱ्याकडे दोन एकर शेती होती. यामध्ये त्यांनी सोयाबीनची लागवड केली होती. मात्र जुलै महिन्यापासून अद्याप पाऊस पडला नाही. यामुळे परळी मतदारसंघासह जिल्ह्यातील उभी पिकं करपत आहेत. त्यामुळे आता घेतलेले कर्ज फेडावं कसं? या विवंचनेत बालाजी ढाकणे असायचे. यामधूनच त्यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे वैजवाडीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, बीड जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. त्यामुळे आता मायबाप सरकारने वेळीच शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे त्यामुळे सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी अनेक विरोधी पक्षांसह शेतकऱ्यांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply