Beed Case : संतोष देशमुख यांच्या भावाला पोलिस संरक्षण, मस्साजोग ग्रामस्थांची मागणी मान्य

Beed Case :बीडमधील मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटले. या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावत आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी अनेक नेत्यांनी केली. खंडणीप्रकरणी वाल्मीक कराडला अटक करण्यात आलं असून, वाँटेड तीन आरोपींचा शोध सुरूय. या प्रकरणानंतर मस्साजोग ग्रामस्थांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आणि बंधू धनंजय देशमुख यांना पोलीस सरंक्षण देण्यात यावे अशी मागणी केली होती. हीच मागणी मान्य करत त्यांना पोलीस सरंक्षण देण्यात आलं आहे.

बीडचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात तापलं. या प्रकरणानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढत आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोका अशी मागणी केली होती. त्यानंतर खंडणी प्रकरणी वाल्मीक कराड पुण्यात सीआयडीसमोर शरण गेला. मात्र अजूनही तीन आरोपी वाँटेड असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.

NHAI Rule : अपघात रोखण्यासाठी NHAI चा मास्टर प्लान; द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर देणार 'ही' सुविधा

मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर त्यांचे बंधु धनंजय देशमुख यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. अशी चर्चा आहे. या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांचे कुटुंब दहशतीखाली असून, त्यांना पोलीस सरंक्षण देण्यात यावं अशी मागणी मनोज जरांगेसह काही नेत्यांनी केली होती. दरम्यान, हीच मागणी मान्य करत धनंजय देशमुख यांना पोलीस संरक्षण देण्यात आलंय.

धनंजय देशमुख जेव्हाही गाव किंवा तालुका सोडून बाहेर प्रवास करतील तर, त्यांच्यासोबत गार्ड असणार असल्याची माहिती आहे. अनेक नेत्यांसह देशमुख कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली होती. मुख्य म्हणजे मस्साजोग येथील ग्रामस्थांकडूनही धनंजय देशमुख यांना पोलीस सरंक्षण देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. हीच मागणी मान्य करीत पोलीस अधीक्षकांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना पोलीस संरक्षण दिलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply