Beed Ajit Pawar Sabha : अजित पवारांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज; सभेची तयारी पूर्ण, बघा कशी आहे व्यवस्था?

Beed Ajit Pawar Sabha: अजित पवार गटाची उद्या राज्यातील पहिली जाहीर सभा बीडमध्ये होत आहे. अजित पवार तसेच पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष खा. प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष खा. सुनील तटकरे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत राहणार आहे. उद्या बीड येथे दुपारी 3 नंतर जाहीर सभा संपन्न होणार आहे. 

या सभेचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जोरदार नियोजन करण्यात येत आहे. अजित पवारांसह सर्वच मंत्र्यांच्या व मान्यवरांच्या स्वागतासाठी बीड नगरी सज्ज झाली आहे. जागोजागी स्वागतच्या कमानी व फलक उभारण्यात आले आहे. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.

असा आहे सभा मंडप?

परभणी येथील प्रसिद्ध संजेरी मंडप यांच्या माध्यमातून या सभेचे स्टेज व मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. 80 बाय 40 फुटांचे भव्य स्टेज तयार करण्यात आले आहे. पावसाचे वातावरण लक्षात घेत भव्य वॉटर प्रूफ मंडप उभारण्यात आला आहे.

या मंडपाची 50 ते 55 हजार लोक बसण्याची क्षमता आहे, महिलांची बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सभास्थळी एकूण 1 लाख पेक्षा अधिक लोक जमतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित अजित पवार गटाचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय व मान्यवर हे एकत्रित दुपारी दीडच्या सुमारास बीड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. त्यानंतर मुख्य रस्त्यावरील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य रॅलीस सुरुवात होईल.

परळी पॅटर्नची जिल्ह्यात चर्चा

दरम्यान, या सभेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार व मंत्रिमंडळातील सर्वच सदस्य प्रथमच बीड जिल्ह्यात येत आहेत. यामुळे बीड शहरात उंच कमानी, कट आऊट, यासह स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

बीड शहरात प्रथमच परळी प्रमाणे नियोजन करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते वाल्मिक कराड यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुरेख नियोजन करण्यात आले असल्याची चर्चा जिल्ह्यात होत 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply