Beed Accident News : आनंदाने लग्नासाठी निघाले, पण वाटेतच मृत्युने गाठलं; कारच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

Beed Accident News : सध्या लगीनसराईचा हंगाम जोमात सुरू आहे. लग्नाच्या तारखा दाट असल्याने अनेकजण एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी लग्नासाठी जात आहे. अशातच रस्त्यांवरील अपघातांच्या घटना देखील वाढल्या आहेत. मंगळवारी परभणीत लग्नाला निघालेल्या दोन तरुणांचा अपघातात मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना, आता बीडमध्ये देखील लग्नासाठी जात असलेल्या दोन व्यक्तींचा अपघातात मृत्यू झाला. 

बीडच्या परळी तालुक्यातील हेळंब घाटात कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये लग्नसमारंभासाठी हेळंबकडे निघालेले दोघे जण जागीच ठार झाले आहेत. ज्ञानोबा गुट्टे (वय ४५) आणि केशव गुट्टे (वय ७५, दोघेही राहणार नंदनज, तालुका परळी) अशी अपघातातील मयतांची नावे आहेत.

मयत ज्ञानोबा गुट्टे व केशव गुट्टे हे दोघेजण दुचाकीवर एका लग्न समारंभासाठी हेळंबकडे निघाले होते. या दरम्यान हेळंब घाटात दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान दोघांचे मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले असून मृतांच्या नातेवाईकांनी टाहो फोडला होता.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply