Beed Accident : धावत्या शिवशाही बसचा टायर फुटला अन् बस थेट डिवाइडरला धडकली

Beed Accident News : बीडच्या धारूर येथून औरंगाबादला जाणाऱ्या चालत्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटल्याने बसला अपघात झालाय. प्राथमिक माहितीवरून या अपघातात काही प्रवासी हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

हा अपघात बीड  जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव- पंढरपूर महामार्गावरील तेलगाव कारखाना परिसरात आज पहाटे झालाय. बसचा टायर फुटल्याने बस ही डिव्हायडरवर जाऊन धडकली. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे.

अपघात झाला त्यावेळी बुसीमध्ये 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. या अपघातात प्रवाशांना किरकोळ मार लागला चालकाच्या सतर्कतेने सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply