Barsu Refinery Protest : धूर सोडल्यामुळे श्वास कोंडला; आम्ही चोरी करण्यासाठी आलो आहे का? आंदोलकाचा संतप्त सवाल

Barsu Refinery News : बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात सुरू असलेले आंदोलन सध्या चांगलेच चिघळल्याचे दिसत आहे. महिला अधिक आक्रमक बारसू येथील महिला अधिक आक्रमक झाल्या आहेत. काहीही झालं तरी आम्ही येथून हलणार नाही. आम्हाला प्रकल्प नकोय. कोणीही प्रकल्पाची जबरदस्ती करु नये, असे सांगत महिला आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.

यावेळी आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहे. डोकं फुटलं तरी चालेल. आम्ही त्यांना काही देणार नाही. अशी भूमिका आंदोलनकर्त्यां महिलांनी घेतली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की,रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील बारसूच्या सड्यावर वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त याठिकाणी तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे एका बाजूला विरोधक आणि दुसऱ्या बाजूला पोलीस आमनेसामने उभे टाकल्याचा चित्र उभे राहिलं आहे.

यावेळी गावकऱ्यांनी बॅरिकेट्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. ज्यामध्ये अनेकजण बेशुद्ध पडले आहेत.

आम्ही चोरी करायला आलोय का? आंदोलकांचा सवाल..

यावेळी" काय झालय ते बघा. हा धूर फेकल्यामुळे अनेजण बेशुद्ध पडले आहेत. चक्कर आली आहे. इथे कोणती सोय नाही. डॉक्टर नाही. आम्ही काय करायचं ते पहिला सांगा. आमच्यावर लाठीहल्ला केला. धूर सोडल्यामुळे लोकांना त्रास झाला आहे. आम्ही काय चोरी करण्यासाठी इथे आलो आहे का? असा सवाल संतप्त आंदोलकाने उपस्थित केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply