Baramati Bus Stand : बारामतीचे सर्वांगसुंदर बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू

Baramti :  शहरातील सर्वांगसुंदर बारामती बस स्थानकातून गुरुवारपासून कामकाज सुरु झाले. सुमारे पन्नास कोटी रुपये खर्चून हे बसस्थानक उभारण्यात आले असून एकाच वेळेस 22 फलाटांवर बसेस उभ्या राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना प्रतिक्षेसाठी प्रत्येक फलाटाच्या बाजूला बैठक व्यवस्था देण्यात आली असून अतिशय प्रशस्त स्वच्छतागृहांचीही सुविधा देण्यात आली आहे. महिलांसाठी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात आला असून दुचाकी व चार चाकी वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा देण्यात आली आहे.बसस्थानकाच्या वरील बाजूस एसटी बँकेस जागा देण्यात आली असून दोनशे आसनक्षमतेचा एक मोठा व पन्नास आसनक्षमतेचा एक छोटा असे दोन मिटींग हॉल करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिका-यांच्या वास्तव्यासाठी दोन सुसज्ज सूट तयार करण्यात आले आहेत. चालक व वाहकांच्या विश्रांतीसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एक ओपन व अंतर्गत असे सुंदर उपहारगृह तयार करण्यात आले असून व्यावसायिक गाळेही येथे तयार करण्यात आले आहेत. बारामतीच्या बसस्थानकावरुन गुरुवारपासून अधिकृतपणे एसटीची वाहतूक सुरु झाली. पहिल्या दिवशी प्रवाशांनी या बसस्थानकाची मुक्त कंठाने प्रशंसा केली.

Mumbai : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले; वर्षा गायकवाड यांच्यासह ६०-७० पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल;

आगार व्यवस्थापक वृषाली तांबे, आर्किटेक्ट सुनील पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता रामसेवक मुखेकर, घनशाम शिंदे, सचिन गुप्ता यांच्या उपस्थितीत प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले गेले. या वेळी बारामती पुणे विनावाहक बसची सजावट करण्यात आली होती. आर्किटेक्ट सुनील पाटील यांनी याचे डिझाईन केलेले असून नाशिकच्या हर्ष कन्स्ट्रक्शन्सने बसस्थानकाची उभारणी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी अहोरात्र मेहनत घेत अवघ्या तीन वर्षात हे बसस्थानक उभारले.

या पुढील काळात नवीन बसस्थानकावरुनच सर्व बसेस सुटणार असून बाहेरून येणा-या बसेसही नवीन बसस्थानकावरच येतील याची प्रवाशांनी नोंद घेण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक वृषाली तांबे यांनी केले आहे. इतक्या भव्य स्वरुपात एखाद्या विमानतळाच्या धर्तीवर उभारलेले बारामतीचे बसस्थानक राज्यातील पहिलेच ठरले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेत पुढील 25 वर्षांचा विचार करुन हे बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेत आज हे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत रुजू झाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply