
Baramati Accident : बारामतीमध्ये ट्रक आणि दुचाकीमध्ये भयंकर अपघात झाला होता. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये वडिलांसह दोन चिमुकलींना ट्रकने चिरडले. त्यामुळे तिघांचाही मृत्यू झाला. या अपघातानंतर त्याच कुटुंबातील चौथ्या व्यक्तीचाही मृत्यू झाला आहे. अपघातामध्ये सोन्यासारखा मुलगा आणि २ नाती गमावल्यामुळे बसलेला धक्का सहन न झाल्यामुळे आजोबांनी देखील प्राण सोडले. २४ तासांत घरातील चौथा व्यक्ती गेल्यामुळे आचार्य कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
बारामतीमध्ये रविवारी दुपारी १२ च्या सुमारास मालवाहू डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला होता. या हृदयद्रावक घटनेमुळे बारामतीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातामध्ये ओंकार आचार्य आणि त्यांच्या मुली सई (११ वर्षे) आणि मधुरा (५ वर्षे) यांचा मृत्यू झाला होता. कुटुंबातील ३ सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे आधीच आचार्य कुटुंब दु:खात होते. अशामध्ये त्याच्या कुटुंबातील आणखी एका सदस्याचे २४ तासांत निधन झाले. त्यामुळे आचार्य कुटुंबाला मोठा धक्का बसला.
|
Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला |
ओंकार आचार्य आणि त्याच्या दोन मुलींचा मृत्यू झाल्याचे वृत्त कळताच त्याच्या वडिलांना मोठा धक्का बसला होता. या घटनेचा धक्का सहन न झाल्यामुळे राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही आज पहाटे निधन झाले. ते निवृत्त शिक्षक होते. अपघातामध्ये आपला सोन्यासारखा मुलगा आणि नाती गेल्यामुळे श्रीनिवास हे सतत रडत होते. त्यांच्या जाण्याच्या दु:खात श्रीनिवास यांनी देखील प्राण सोडले. २४ तासांत एकाच कुटुंबातील ४ सदस्यांचा मृत्यू झाल्यामुळे बारामतीमध्ये शोककळा परसरली आहे.
दरम्यान, ओंकार आचार्य हे रविवारी दुपारी १२ वाजता आपल्या दोन मुलींना घेऊन दुचाकीवरून प्रवास करत होते. ते खंडोबानगर चौकातून जात असताना भरधाव मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये तिघांच्याही अंगावरून ट्रकचे चाक गेले. या अपघातामध्ये ओंकार यांनी जागीच प्राण सोडले. तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या दोन्ही मुलींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांनाही मृत घोषीत केले. या अपघात प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे. पोलिस सध्या या अपघाताचा तपास करत आहेत.
शहर
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

